Failed to add new visitor into tracking log रेवदंडा समुद्रकिनारा | रेवदंडा बीच | Revdanda beach
English
Marathi

रेवदंडा समुद्रकिनारा

रायगड , अलिबाग

रेवदंडा समुद्रकिनारा फोटोगॅलरीअलिबाग स्थानकापासून १७ किमी. अंतरावर असणारे हे ऐतिहासिक बंदर आहे. याच ठिकाणी रोहयाहून येणार्‍या कुंडलिका नदीचा अरबी समुद्राशी संगम होऊन खाडी तयार झाली आहे. रेवदंडा बंदराच्या पलिकडे साळाव गावापासून मुरूड तालुक्याची हद्द सुरू हते. या खाडीवर बांधलेला मुरूड आणि अलिबाग तालुके जोडणारा वाहतुकीच्या संदर्भात उपयुक्त ठरणारा साळाव खाडी पूल १९८६ पासून वाहतुकीस खुला झाला आहे. या पुलावरून मुद्दामहून फेरफटका मारा. सभोवतालच्या नैसर्गिक परिसराची अजब किमया तुम्हाला गुंग करील. साळावकडील टोकावरून संपूर्ण रेवदंडाचा परिसर सागराचे विलोभनीय दर्शन खाडीतील गलबतांची वहातुक तसेच डाव्या बाजूला दूरवर दिसणारे विक्रम इस्पात कंपनी तर उजव्या बाजूस या पुलाजवळच विक्रम इस्पात कंपनीची जेटी दिसते.

रेवदंडा बंदराजवळच एस.टी. स्थानक तसेच तीन व सहा आसनी रिक्षांचे स्थानक आहे. एस.टी. स्थानकाच्या मागील बाजूस खाडीत छोटासा धक्का पकटी आहे. या भागात मासेमारीचा व्यवसाय जोरात चालतो. मासे पकडून आणलेली गलबते होडया या धक्क्याजवळच थांबतात. या ठिकाणी ताज्या मासळीची खरेदी-विक्री होते.

 • क्रियाकलाप करू घेणे :

 • राहण्यासाठी खोल्या :

 • कसे जावे :
  अलिबाग स्थानकापासून १७ किमी.

 • विमान:

 • रेल्वे :

 • बस:
  रेवदंडा बंदराजवळच एस.टी. स्थानक तसेच तीन व सहा आसनी रिक्षांचे स्थानक आहे.

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  आक्षी-नागाव , चौल / रेवदंडा , आवास - सासवणे

 • अधिकृत संकेतस्थळ : www.alibaugtourism.com

 • नकाशा : रेवदंडा समुद्रकिनारा

 •  
 • Social Links :