Failed to add new visitor into tracking log वर्सोली समुद्रकिनारा | वर्सोली बीच | Varsoli Beach | Varsoli beach alibaug | beaches in alibaug
English
Marathi

वर्सोली समुद्रकिनारा

रायगड , उत्तर अलिबाग

वर्सोली समुद्रकिनारा फोटोगॅलरीअलिबाग जवळ असलेला वर्सोली बीच म्हणजे एक शांत समुद्र किनारा ! अलिबागच्या गर्दीच्या तुलनेत हा समुद्रकिनारा काहीसा आत असल्याने तिथलं नैसर्गिक सौंदर्य बघायलाच हवं नारळाच्या झाडांनी वेढलेला हा किनारा सुंदर असला तरी तितकाच स्वछही आहे . परंतु खोल असल्यामुळे पाण्यात जाताना मात्र सावधनता बाळगावी लागते . वर्सोली हे छोटंसं गाव असून अलिबागपासून आतल्या बाजूला सुमारे २० मिनिटांच्या अंतरावर हा समुद्र आहे . गर्दी , गोंधळ यांपासून लांब जायचं असेल तर वर्सोलीचा पर्याय योग्य ठरतो . शिवाय जास्त लांब नसल्यामुळे एक - दीड दिवसाची ट्रीपदेखील पुरेशी ठरते . वर्सोलीत राहायची विशेष सोय नसली तरी अलिबाग जवळ असल्याने तिथे राहून या समुद्रावर जाता येतं .

 • क्रियाकलाप करू घेणे :

 • राहण्यासाठी खोल्या :

 • कसे जावे :
  मुंबई गोवा हायवे वरून अलिबागला जाता येतं . नाशिकपासून सुमारे २५० किमी अंतर असल्यामुळे कोकणच्या तुलनेत इथं लवकर पोचता येतं .मुंबईहून अलिबागला लाँचने जायची सोय गेट वे ऑफ इंडियापासून आहे .

 • विमान:

 • रेल्वे :

 • बस:

  खाजगी वाहनानं किंवा एसटी बसनं अलिबागला जाता येतं . अलिबाग पासून वर्सोलीला रिक्षा , टमटमने देखील जाण्याची सोय आहे .

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  अलिबागला राहायचा प्लॅन असेल तर तिथून सुमारे दीड तासाच्या अंतरावर असलेलं बिर्ला मंदिर बघता येईल . शिवाय अलिबागच्या समुद्रातला प्रसिद्ध कुलाबा किल्लादेखील बघता येऊ शकतो . समुद्रात असलेला हा किल्ला बघायचा असेल तर भरतीच्या वेळी बोटीनं आणि ओहोटीच्या वेळेस चालत जायची सोय आहे .

 • अधिकृत संकेतस्थळ : www.alibaugtourism.com

 • नकाशा : वर्सोली समुद्रकिनारा

 •  
 • Social Links :