Failed to add new visitor into tracking log
रत्नागिरीपासून अगदी जवळ असणारं भाट्ये हे छोटंसं गाव तिथल्या समुद्रकिनाऱ्यासाठी विशेष ओळखलं जातं . इथला लांबलचक समुद्रकिनारा मनाला विशेष भुरळ घालतो . हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या समुद्राकडे तासनतास बघण्यात वेळ कसा छान जातो . साधारण दीड किलोमीटरच्या परिसरात हा समुद्रकिनारा पसरला असून सकाळच्या वेळी ओल्या वाळूवर चालून एक वेगळा आनंद घेत येतो . या बीचमधून रत्नागिरीचं लाईट हाऊस आणि मांडवी बीचदेखील दिसतो . समुद्रावरच्या भेळपुरीची मज घ्यायची असेल तर इथे जायलाच हवं . सगळ्या प्रकारच्या चाट बीचजवळ बसून खाता येत असल्याने पर्यटकांना हा किनारा आवडतो . एक संपूर्ण दिवस आराम करून निसर्गाच्या सोबतीनं राहायचं असेल तर भाट्ये बीच हा एक चांगला पर्याय ठरू शकतो .
राहण्यासाठी खोल्या :
हॉटेल्स आणि कॉटेज रत्नागिरी आणि गणपतीपुळे जवळ उपलब्ध आहेत.
कसे जावे :
स्थान केवळ रत्नागिरी शहराच्या मुख्य रस्त्यापासून 1.5 कि.मी. अंतरावर आहे. समुद्रकाठ रत्नागिरी पासून पावस मार्ग आहे . रत्नागिरी बस स्टँड पासून भाट्ये ला एस टि महामंडळाने शहर तसेच ग्रामीण बस सेवा दिली आहे .रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून 12 कि.मी. , रत्नागिरी बस स्टँड पासून = 2 कि.मी.
विमान:
जवळील विमानतळ रत्नागिरी मुंबई
रेल्वे :
जवळील रेल्वे स्टेशन रत्नागिरी
बस:
पुणे पासून 307 किमी . मुंबई पासून 334 किमी .
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
गणपतीपुळे मंदिर , आरेवारे बीच , मार्लेश्वर ,मालगुंड , डेरवण ,थिबव पॅलेस , रत्नदुर्ग किल्ला , गणेशगुळे बीच
अधिकृत संकेतस्थळ : www.ganpatipuletourism.in
नकाशा : भाट्ये समुद्रकिनारा