Failed to add new visitor into tracking log निवती समुद्रकिनारा | निवती बीच | Nivti beach | places to visit in vengurla | sindhudurg places to visit
English
Marathi

निवती समुद्रकिनारा

सिंधुदुर्ग,कुडाळ

निवती समुद्रकिनारा फोटोगॅलरीकुडाळपासून साधारण २५ किमी वर निवतीचा किनारा आहे. कुडाळ- पाट-म्हापण-निवती असा प्रवास आहे. खाडीच्या दक्षिणेकडे निवती बंदर आणि उत्तरेकडे श्रीरामवाडी. निवतीला विजयालक्ष्मी पंडितांचे घर आणि आंब्याची विस्तीर्ण बाग आहे. निवतीच्या पूर्व-दक्षिण समुद्र किनारा पसरलेला आहे. सकाळी आकाश निरभ्र असेल तर सुर्योदयाचे फोटो छान मिळतात. गावाच्या पश्चिमेस निवती किल्ला समुद्रात पाय पसरून उभा आहे. किल्लयावर पडके बुरूज, खंदक आणि बऱ्यापैकी झाडी आहे. क्वचित मोर आणि जंगली प्राणीही दिसतात. भोगव्याच्या बाजूने थोडीशी दमछाक करणारी चढण आहे. किल्ल्यावरून भोगव्याचा किनारा अत्यंत सुंदर दिसतो. तासन तास इथून जाऊ नये असे वाटते. संध्याकाळी सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य दिसते. भोगवे-निवती किल्ला-निवती गाव व त्यापुढील किनारा असे चालत गेल्यास एक दिवसाची छान सहल होते. साहसाचाही आनंद मिळतो. किनाऱ्यावर खडकामध्ये अनेक समुद्री जीव आढळतात. कुडाळ-पाट-परूळे-भोगवे असेही जाता येते. आणि भोगव्याच्या किनाऱ्यावरून निवती किल्ल्यावर चढता येते. पाट येथे गावतळयामध्ये वेगवेगळया रंगाची कमळे आहेत. या विस्तीर्ण तळयाच्या पश्चिमेस दलदलीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी नेहमी दिसतात. निवतीच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात अणि जवळून 'डॉल्फिन' माशाच्या झुंडी पाहाता येतात. डॉल्फिनचे नृत्य पाहाण्याचा आनंदही अनुभवता येतो. यांत्रिकी होड्यांमधून समुद्र सफर करत ' डॉल्फिन' चे नृत्य पाहाता येते. हे डॉल्फिन मोठ्या संख्येने येथे पाण्यावर येतात. यांत्रिकी पर्यटक होड्यांच्या जवळूनच त्यांचा जलविहार चालू असतो. उंच उड्या मारत जलविहार करणारे डॉल्फिन पाहाणे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा असणारे बीच रिसॉर्टही येथे आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :
  हॉटेल्स आणि रेसोर्ट्स निवती समुद्र जवळ उपलब्ध आहेत.

 • कसे जावे :

 • विमान :
  जवळचे विमानतळ दाबोलीम गोवा आहे.

 • रेल्वे :
  जवळचे रेल्वे स्थानक कुडाळ आहे .

 • बस :
  निवती ​​राज्यातील इतर भागात जोडलेले आहे आणि तसेच राष्ट्रीय महामार्ग (महामार्ग 17 ) फक्त 20 कि.मी. आहे

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  अंजुना समुद्र , कालाचा बीच , तेरेखोल किल्ला

 • अधिकृत संकेतस्थळ : www.vengurlatourism.com

 • नकाशा :निवती समुद्रकिनारा

 •  
 • Social Links :