Failed to add new visitor into tracking log तोंडवली समुद्रकिनारा | तोंडवली बीच | beaches in malvan | sindhudurg places to visit
English
Marathi

तोंडवली समुद्रकिनारा

सिंधुदुर्ग , तोंडवली

तोंडवली समुद्रकिनारा फोटोगॅलरीदेवबाग कर्ली नदीइतकाच सुंदर किनारा आहे तळाशील गड नदीचा. गड नदी समुद्राला भेटायला येते ती तोंडवलीपासून. तळाशीलपर्यंत समुद्राला समांतर वाहते. मालवण, हडी, तोंडवली, तळाशील असा गाडीरस्ता उपलब्ध आहे. नदीच्या एका बाजूला तोंडवली, तळाशील, तर दुसऱ्या बाजूला ओझर, रेवंडी, कोळंब आहे. ओझरची ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे. ओझरजवळ आहे रेवंडी. मालवणचा सुपुत्र "वस्त्रहरण'कार मच्छिंद्र कांबळींचं गाव. गावात भद्रकालीचं मंदिर आहे. रेवंडीतल्या तरीवरून तळाशीलला बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली, की बांद्याच्या पुढे ओसाड बेट आहे. त्यावरून गड नदीच्या मुखाचं सुंदर दर्शन होतं. रेवंडीतूनसुद्धा गड नदी समुद्राला मिळते ती जागा बघण्यासारखी आहे. तोंडवळीचा सुरूचा किनारा, तळाशीलचा माडांच्या चिंचोळ्या पट्टीचा किनारा खास बघण्यासारखा.

 • राहण्यासाठी खोल्या :
  हॉटेल्स आणि रेसोर्ट्स बीच जवळ उपलब्ध आहेत.

 • कसे जावे :

 • विमान :
  दाबोलीम, गोवा

 • रेल्वे :
  जवळचे रेल्वे स्थानक कणकवली किंवा कुडाळ आहे .

 • बस :
  मुंबई ते तोंडवली बीच : सायन-वाशी -पनवेल -पेन -महाड -खेड -चिपळूण -संगमेश्वर -हातखांबा -राजापूर -कणकवली -कसाल -चौके -मालवण -तोंडवली बीच . मुंबई ते तोंडवली अंतर ५५५ किमी.
  पुणे ते तोंडवली बीच(कोल्हापूर मार्गे): पुणे -सातारा -कराड -कोल्हापूर -राधानगरी - दाजीपुर -फोंडा -नांदगाव -कणकवली -कसाल -चौके -मालवण -तोंडवली बीच . पुणे ते तोंडवली बीच अंतर ४५० किमी
  पुणे ते तोंडवली बीच (ताम्हिणी घाट मार्गे ) : पुणे -पौंड -मुळशी -ताम्हिणी घाट -माणगाव -महाड -पोलादपूर -चिपळूण -संगमेश्वर -हातखांबा -राजापूर -कणकवली -कसाल -चौके -मालवण -तोंडवली बीच

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  रामेश्वर मंदिर , कुणकेश्वर मंदिर आणि समुद्रकिनारा , आंबोली घाट , भोगावे समुद्र किनारा , सिंधुदुर्ग किल्ला , जय गणेश मंदिर

 • अधिकृत संकेतस्थळ : www.malvantourism.in

 • नकाशा : तोंडवली समुद्रकिनारा

 •  
 • Social Links :