Failed to add new visitor into tracking log
पुण्यापासून १२७ किमी अंतरावर असलेले भीमाशंकर, बारा ज्योतीर्लिंगापैकी एक आहे. भीमेचे उगमस्थान असलेले क्षेत्र भीमाशंकर पुणे आणि मुंबईहूनही भीमाशंकर साठी राज्य परिवहन बससेवा आहे. मंचरहून घोडेगावसाठी फाटा फुटतो. घोडेगावहून पुढे पोखरी घाटाने वर चढले की भीमाशंकर येते. वाटेत डिंभे धरणाचेही दर्शन घडते.
समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचीवर असलेले भीमाशंकर हे स्थान घनदाट जंगलाने वेढलेले आहे. तीन साडेतीन फूट लांबीची शेकरु ही तांबुस रंगाची खार या जंगलाचे प्रमुख आकर्षण मानले जाते. बिबट्या, सांबर, रानडुकरे, तरस, मुंगुस, रानगाय, साळिंदर, भेकर असे वन्यजीवन येथे आढळते. तसेच कोकिळ, बुलबुल, मोर, रानकोंबडा आणि गरुड हे पक्षीही येथे आढळतात. येथील जंगलात आंबा, जांभूळ, फणस, हिरडा, बेहडा, कारची, लोहारी, लोखंडी, कढीलिंब यांची दाट झाडे आणि झुडपे सर्वत्र आढळतात.
हनुमानतळे, नागफणा, गुप्त भीमाशंकर, भीमेचे उगमस्थान, मुंबई टोक, सूर्यास्त टोक अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत. येथील प्राचीन मंदिराचा नाना फडणवीसांनी जीर्णोद्धार केला. चिमाजी अप्पांनी दिलेली भलीमोठी घंटा येथे आहे.
३५०० फूट उंचीचा रायगड जिल्ह्यातील भिमाशंकरच्या विस्तिर्ण डोंगररांगेतील आणि गिरीदुर्ग प्रकारात गणला जाणारा हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अतिशय कठीण मानला जातो.
भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग. सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर वसलेले एक पवित्र देवस्थान. भीमाशंकराचा आजुबाजूचा प्रदेश हा अतिशय घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. येथे महाराष्ट्र सरकारचे अभयारण्य आहे.
जेवणाची सोय : भीमाशंकरला जेवणासाठी हॉटेल्स आहेत.
जेवणाची सोय : भीमाशंकरला जेवणासाठी हॉटेल्स आहेत.
राहण्यासाठी खोल्या :
भीमाशंकर गावा बाहेर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे हॉटेल आहे. गावात घरगुती पण महागडी अशी रहाण्याची सोय होते. पावसाळ्यात मात्र रहाण्याची गैरसोय होते.
कसे जावे :
भीमाशंकराला जाण्यासाठी मुंबईहून कर्जतला यावे. पुणेकरांनी स्वारगेटवरून एस.टी. अथवा ट्रेनने कर्जत गाठावे. कर्जतहून खांडस या गावी यावे खांडस ते कर्जत सुमारे ३४ कि.मी. चे अंतर आहे. कर्जतहून खांडसला बसने अथवा रिक्षेने येण्याची सोय होते. खांडस गावातून शिडी घाट आणि गणेश घाट या दोन्ही वाटांनी भीमाशंकर गाठता येते.
विमान:
रेल्वे :
बस:
गणेश घाट : खांडस गावातून दोनकि.मी. अंतरावर एक पूल लागतो. या पुलापासून उजवीकडे जाणारी कच्च्या रस्त्याची वाट गणेश घाटाची आहे. ही वाटा अत्यंत सोपी आहे. या वाटेने तासभराच्या अंतरावर एकगणेशाचे मंदिर लागते. या वाटेने वर जाण्यास ६ ते ७ तास लागतात. शिडी घाट : पुलाच्या डावीकडे जाणारा रस्ता आपणास गावात घेऊन जातो. गावातून विहिरीच्या डाव्या बाजूने जाणारी वाट ही शिडी घाटाची आहे. ही वाट सर्व वाटांमध्ये अवघड आहे. पावसाळ्यात ही वाट फारच निसरडी होत जाते. या वाटेने दीड तासांत ३ शिड्या लागतात. तीसऱ्या शिडी नंतर अर्ध्या तासात एक वाडी लागते. या वाडीमध्ये ‘पुंडलिक हंडे’ यांचे घर आहे. वाडी पासून वर चढत गेल्यावर एक झाप लागते. या ठिकाणी गणेश आणि शिडी घाटातील वाटा एकत्र होतात. येथे चहा-पाण्याची चांगली सोय होते. इथून पुढे दीड तासांत आपण एका तळ्यांपाशी पोहचतो. या तळ्यापासून डावीकडे जाणारी वाट आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
भीमाशंकराचे मंदिर , नागफणीचे टोक , भीमाशंकर
नकाशा : भीमाशंकर किल्ला