Failed to add new visitor into tracking log रायगड किल्ला | Raigad Fort | Raigad fort Mahad | Places to visit in Raigad | Raigad Shivaji Maharaj
English
Marathi

रायगड किल्ला

रायगड, महड

रायगड किल्ला फोटोगॅलरी

रायगड हा समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर अंदाजे २७०० फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत.रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते .जावळीचा प्रमुख यशवंतराव मोरे हा जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला.छत्रपति शिवरायांनी,६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला.कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेल्या खजिन्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला.रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवरायांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.

सभासद बखरीमध्ये रायगडाबद्दल पुढीलप्रमाणे वर्णन आहे,‘राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा'

दिनांक ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी रायगडावर राजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. ता. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी अश्विन शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी राजांनी स्वतःचा तांत्रिक पद्धतीने आणखी एक राज्याभिषेक करून घेतला.

शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु.७, इ.स.१६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.तर शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक झाला.दि.३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या फितूर किल्लेदारामुळे हा किल्ला मोगलांना मिळाला.दिंनाक ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला.पुढे इंग्रजांनी पेशव्यांच्या ताब्यातून गड कब्जात घेतल्यानंतर लुटून,आग लावून किल्ल्याची नासधूस केली,त्यामुळे आज किल्ला पडझडीच्या अवस्थेत उभा आहे.

गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत तसेच रोपवेची व्यवस्था उपलब्ध आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :
  रायगड जिल्हापरिषद,महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या तसेच खाजगी बंगल्यामध्ये राहण्याची,जेवणाची सोय उपलब्ध आहे.पिण्याच्या पाण्याची गडावर व्यवस्था आहे.

 • कसे जावे :
  मुंबई - गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बसेस सुटतात. तसेच बस स्थानका बाहेरून जीपगाड्याही जातात. बसने आल्यावर चित्‌ दरवाज्यापाशी, (जो आता अस्तित्वात नाही) जिथे पायर्‍या सुरू होतात. तेथे उतरून पायर्‍यांनी गडावर जाता येते. जवळजवळ १५०० पायर्‍या चढून गेल्यावर महादरवाजातून आपला गडात प्रवेश होतो.

 • विमान:

 • रेल्वे :

 • बस:

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  महादरवाजा, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, राजसभा, बाजारपेठ, शिकाई देऊळ, जगदीश्वर मंदिर, खुबलढा बुरूज, मदारमोर्चा, नाना दरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, मेणा दरवाजा, राजभवन, कुशावर्त तलाव, टकमक टोक, वाघदरवाजा आणि हिरकणी टोक

 • नकाशा : रायगड किल्ला

 •  
 • Social Links :