Failed to add new visitor into tracking log
सुवर्णगडाच्या संरक्षणासाठी हर्णे गावाच्या समुद्रकिनार्यावर गोवा किल्ला, कनकदुर्ग आणि फत्तेगड हे तीन उपदुर्ग बांधण्यात आले. त्यापैकी गोवा किल्ला व कनकदुर्ग यांचे काही अवशेष आजही शाबूत आहेत. परंतु फत्तेगडाची समुद्राकडील भिंत(तटबंदी) व कनकदुर्ग आणि फत्तेगड यांच्या मधील दगडी पुल सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत.
इतिहास : फत्तेगडाची उभारणी खर्यातखान याने केली व त्याची निर्मिती शिवकालानंतरची असावी असे मानतात. कान्होजी आंग्रे - मानाजी आंग्रे यांनंतर सुवर्णगड ,गोवा किल्ला, कनकदुर्ग आणि फत्तेगड या किल्ल्यांचा ताबा तुळाजी आंग्रे यांच्याकडे गेला. पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यावर , पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने तुळाजी आंग्रे यांच्या विरुध्द मोहीम उघडली. त्यावेळी कमांडर जेम्स याने हे किल्ले जिंकून पेशव्यांच्या हवाली केले. इ.स. १८१७ मध्ये इंग्रजांनी हे किल्ले पेशव्यांकडून जिंकून घेतले.
जेवणाची सोय : जेवणाची सोय किल्ल्यात नाही, हर्णे गावात आहे.
पाण्याची सोय : पाण्याची सोय किल्ल्यात नाही, हर्णे गावात आहे.
राहण्यासाठी खोल्या :
कसे जावे :
मुंबईहून दापोली मार्गे मुरुड हर्णेला जाता येते. हर्णेच्या समुद्रकिनार्यावर उंचवट्यावर कोळी लोकांची वस्ती दिसते, ही वस्ती फत्तेदुर्ग मध्येच वसलेली आहे.
विमान:
रेल्वे :
बस:
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
किल्ल्याचे क्षेत्रफळ पाऊण हेक्टर होते. फत्तेगडाची समुद्राकडील भिंत(तटबंदी) व कनकदुर्ग आणि फत्तेगड यांच्या मधील दगडी पुल सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत.
नकाशा : फत्तेगड / फतेदुर्ग किल्ला