Failed to add new visitor into tracking log मोरयाचा धोंडा | मालवण | सिंधुदुर्ग | Moryacha dhonda | Places to visit in malvan | Sindhudurg fort
English
Marathi

मोरयाचा धोंडा

सिंधुदुर्ग , मालवण

फोटो गॅलरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्‍हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनार्‍याची पाहणी झाली. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्यकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती कोरुन त्या जागी महाराजांनी पूजा केली.

जिथे छ. शिवरायांनी किल्ल्याची पायाभरणी केली त्या जागी म्हणजे मोरयाचा धोंडा.

दिनांक २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवण किनार्‍यावरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला.

शिवरायांचा मोरयांचा धोंडा
मालवण समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग किल्ला उभारण्याचा संकल्प सोडला; परंतु भूमिपूजन कुठे करायचे अन् भूमिपूजन म्हणजे गणेश पूजा या संकल्पनेखाली महाराजांनी आपला साथीदार हिरोजीला काळा खडक दाखविला व सांगितले तिथे हातोडा, छिन्नी घेऊन गणपतीचे चित्र काढा. शिवलिंग व नंदीही तेथे हवा झाला. महाराजांनी तेथे नतमस्तक होऊन मंगलमूर्ती मोरया असे म्हटले आणि हा मोरयाचा धोंडा लोकांच्या भक्तीचे स्थान बनला. या काळात लोक तेथे पूजाअर्चा करतात.

 • राहण्यासाठी खोल्या :
  हॉटेल्स मालवण शहर जवळ उपलब्ध आहेत

 • कसे जावे :
  मालवण शहरापासून अगदी जवळ

 • विमान :
  दाबोलीम गोवा ८७ किमी.

 • रेल्वे :
  जवळील रेल्वे स्थानक सावंतवाडी.

 • बस :
  मुंबई - पनवेल - महाड - हाथखंबा - लांजा - कसाळ - मालवण. कसाळ हे मालवण शहरापासून ३५ किमी आहे. पुणे - सातारा - कोल्हापूर - गगनबावडा - कसाळ - मालवण

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :

  सिंधुदुर्ग किल्ला , जय गणेश मंदिर , तारकर्ली समुद्रकिनारा

 • नकाशा : मोरयाचा धोंडा

 •  
 • सामाजिक दुवा :