Failed to add new visitor into tracking log मोती तलाव | सावंतवाडी | सिंधुदुर्ग | Moti Talav | Moti Lake | Places to visit in sawantwadi | Sindhudurg
English
Marathi

मोती तलाव

सिंधुदुर्ग ,सावंतवाडी

फोटो गॅलरी

निसर्गरम्य सावंतवाडीत आल्या आल्या समोर दिसणारा मोती तलाव आणि संध्याकाळच्या सुरम्य अशा वातावरणातच सावंतवाडी च खर वैभव दडलय. संध्याकाळ च्या वेळी कधी मोती तलावाच्या कट्यावर न बसलेला सावंतवाडीकर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही.

तलावात पूर्वी कधी मोती सापडले होते म्हणून त्या तलावास "मोती तलाव" असे नाव पडले. चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वत रांगानी वेढलेले सावंतवाडी शहर आणि शहराच्या मध्यभागी मोती तलाव. सध्या तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तलावात कारंजे सुध्दा बसविण्यात आलेले आहेत. तसेच संपूर्ण तलावाच्या कडेला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.

मोती तलाव ही सावंतवाडी शहराची ओळख म्हणता येईल. शहर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत आहे. येथे शिल्पग्राम, जगन्नाथराव भोसले उद्यान आदी पर्यटन प्रकल्प सुरू झाले आहेत. मोती तलावातही जलक्रीडा केंद्र कार्यान्वित आहे. बोटींग, गति बोटींग, स्कूटर बोटींग सुविधा उपलब्ध आहेत.

 • राहण्यासाठी खोल्या :
  हॉटेल्स मोती तलाव जवळ किंवा सावंतवाडी मध्ये उपलब्ध आहेत.

 • कसे जावे :
  मोती तलाव सावंतवाडी पॅलेस समोर वसलेले एक सरोवर आहे.

 • विमान :
  दाबोलीम गोवा ८७ किमि.

 • रेल्वे :
  जवळील रेल्वे स्थानक सावंतवाडी आहे.

 • बस :
  मुंबई गोवा महामार्ग वरून मुंबई ते गोवा ५०५ किमी आणि कणकवली ते सावंतवाडी ५३ किमी

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :

  सावंतवाडी राजवाडा , आंबोली थंड हवेचे ठिकाण

 • नकाशा : मोती तलाव

 •  
 • सामाजिक दुवा :