Failed to add new visitor into tracking log नवाबाचा राजवाडा | मुरुड | रायगड | Nawab Palace | Murud Janjira | Raigad | Places to visit in Murud
English
Marathi

नवाब राजवाडा

रायगड ,मुरुड

फोटो गॅलरी

मुरुड गावात असलेला इतिहासकालीन राजवाडा `नबावाचा राजवाडा' म्हणून प्रसिद्ध आहे. हा वाडा तसा जुनाट असला तरी भग्नावस्थेतही त्याची भव्यता, बांधकामातील सौंदर्य आजही आपल्याला थक्क करते.

मुरूड शहरात प्रवेश करतांना आपले लक्ष वेधून घेतो तो नबाबाचा भव्य राजवाडा. सन १८८५ च्या सुमारास नबाब सदर राजवाडयाची निर्मती करून त्या ठिकाणी रहावयास गेले. राजवाडयाचे वास्तुशिल्प मुघल व गोपिक पध्दतीचे असल्याचे समजते. हा राजवाडा नबाबांची खाजगी मालमत्ता असून तेथे त्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे हा भव्य ऐतिहासिक राजवाडा बाहेरून पहावा लागतो. या ठिकाणाहून मुरूड शहर व भोवतालच्या सागरी परिसराचे विलाभनीय दर्शन होते.

 • राहण्यासाठी खोल्या :
  हॉटेल्स मुरुड जवळ उपलब्ध आहे.

 • कसे जावे :
  अलिबाग पासून ४२ किमी दूर.

 • विमान :
  जवळील विमानतळ मुंबई आहे.

 • रेल्वे :
  जवळील रेल्वे स्थानक रोहा आहे.

 • बस :
  मुरुड मुंबई पासून 165 किमी आहे, 5 तास एक प्रवास.

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :

  जंजिरा किल्ला

 • नकाशा : नवाब राजवाडा

 •  
 • सामाजिक दुवा :