Failed to add new visitor into tracking log
वेंगुर्ला बंदर हे स्वातंत्र्यपूर्व काळात आशिया खंडातील पश्चिम किनार्यावरील आयात - निर्यातीचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. या बंदरासमोर असलेलं शासकिय निवासस्थान म्हणजे 'सागर बंगला'. ब्रिटिश राजवटीपासून अथांग समुद्राचे दर्शन घडविणार्या या विश्रामगृहात नेहमीच गर्दी असते. वेंगुर्ले बंदर, दिपगृह, मार्केट, दाभोली मठ, निशाण तलाव याबरोबरच वेंगुर्ला प्रसिद्ध आहे ते इथल्या मंदिरासाठी.
वेंगुर्ले ! अगदी पाहताक्षणी प्रेमात पडावं असे गांव सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दक्षिणेकडचा आणि रूपेरी सागर किनार्यांची शाल पांघरलेला छोटासा निसर्गरम्य तालुका म्हणजे वेंगुर्ले. आणि वेंगुर्ले शहर हे त्यांचे तालुक्याचे ठिकाण. इथली सौंदर्यस्थळं किती सांगावीत? भल्याभल्यांना मोहात पाडणारा बंदरावरचा बांधकामखात्याचा सागरबंगला, त्याच्या मागच्या डोंगरावरचे दीपगृह, नगरपरिषदेचं मार्केट, बस स्टॅण्ड जवळचं मानसीश्चराचं देवस्थान, दाभोलीकडे जातानाचाछोटासा घाट, नारायणतलाव, सागरेश्चराचा रम्य किनारा, भरगच्च बाजारपेठ आणि खवय्यांची रसना तृप्त करणार्या अस्सल मालवणी खानावळी ही यादी आहे न संपणारी!
वेंगुर्ले शहर वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळं दिसतं. दाभोली घाटीच्या माथ्यावरून पाहिलं तर उठून दिसतो सागरबंगला आणि सागरेश्चराचीपुळण, सागरेश्चर ते बंदर हा किनारा अर्धचंद्नाकृती आहे. या घाटीतून वेंगुर्ले अगदी निरागसबाळासारखं दिसतं. सागरेश्चराच्या किनार्यावरून दिसणारं वेंगुर्ले अगदी टुमदार, झाडामाडांत लपलेलं अस दिसतं.
राहण्यासाठी खोल्या :
सागर बंगला मध्ये राहण्याची सोय आहे.
कसे जावे :
विमान :
दाबोलीम , गोवा.
रेल्वे :
कोंकण रेल्वे मार्गे जवळील रेल्वे स्टेशन कुडाळ.
बस :
वेंगुर्ला पासून १ किमी.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :
सागरेश्वर समुद्रकिनारा , वेतोबा मंदिर , रेडी गणेश मंदिर
नकाशा : सागर बंगला