Failed to add new visitor into tracking log सावडाव धबधबा | कणकवली | सिंधुदुर्ग | Savdav Waterfall | Kankavli | Sindhudurg | Places to visit in kankavli
English
Marathi

सावडाव धबधबा

सिंधुदुर्ग , कणकवली

फोटो गॅलरी

कणकवली तालुक्यातला सावडाव हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांनी बहरुन जातो. डोंगरपठारावरुन वाहणारा पाण्याचा प्रवाह अचानक पसरट कड्यावरुन खाली कोसळतो. सुमारे ७० फूट रुंदीचा आणि तेवढ्याच उंचीचा हा धबधबा म्हणजे गर्द हिरव्या झाडाझुडपांतला आनंदाचं उधाणच. प्रवाहाच्या बाजूला एक गुहा आहे. शिवाय प्रवाह कोसळतो तिथला तलावासारखा डोह विस्तीर्ण आहे. धबधब्याखाली आंघोळीचा आनंद लुटता येतो. सुरक्षित असा हा धबधबा आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :
  कणकवली जवळ हॉटेल्स उपलब्ध आहेत.

 • कसे जावे :
  कणकवलीहून अंतर- १२ कि.मी.,बेळणे फाटय़ाहून अंतर- ६ कि.मी.,ओटव फाटय़ाहून अंतर- ९ कि.मी.

 • विमान :
  जवळील विमानतळ दाबोलीम आहे.

 • रेल्वे :
  कणकवली रेल्वेस्टेशनपासून १५ किलोमीटर्स हायवेवरुन ७ किलोमीटरवर सावडाव हे गाव आहे

 • बस :
  इथे मुंबई - गोवा महामार्गावरील बेळणे ङ्गाटा येथून जाता येते. कणकवलीहून बसने जाण्याची सोय आहे. खाजगी वाहने थेट धबधब्याजवळच पोहोचतात.

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :

  भालचंद्र महाराज आश्रम , कुणकेश्वर सागर किनारा आणि मंदिर

 • नकाशा : सावडाव धबधबा

 •  
 • सामाजिक दुवा :