Failed to add new visitor into tracking log व्याघ्रेश्वर धबधबा | सिंधुदुर्ग | Vyaghreshwar Waterfall | Vyaghreshwar Dhabdhaba | Sindhudurg | Saitwade Waterfall
English
Marathi

व्याघ्रेश्वर धबधबा

सिंधुदुर्ग , मणचे

फोटो गॅलरी

देवगड समुद्राची भूमी जांभ्या दगडाची आणि लहान लहान डोंगर उताराची असली तरी येथे अतिशय विलोभनीय असे मणचे आणि सैतवडे असे दोन धबधबे आहेत.

विजयदुर्ग-तळेर मार्गावर तरळयापासून 20 कि.मी अंतरावर मणचे फाटा आहे. तेथून 5 कि.मी. अंतरावर मणचे धबधबा आहे. देवगड पासून 35 कि.मी. अंतर आहे.

हा एक निसर्गाचा अद्भूत चमत्कार म्हणायला हरकत नाही.सुमारे 300 फूट उंचीवरून बारमाही कोसळणारा हा धबधबा सौंदर्याने अतिशय नटलेला आहे. हा संपूर्ण परिसरच निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. इतक्या उंचीवरून फेसाळत कोसळणा-या धबधब्याच्या प्रवाहाखाली स्नानाचा मनमुराद आनंद पर्यटकांना लुटता येतो. काळ्या कातळातून पाणी सतत वहात असल्याने नैसर्गिकरीत्याच येथे लहानमोठी जलकुंडे तयार झाली आहेत. या ठिकाणी पोहोण्याचा आनंद लुटता येतो. धबधब्यापर्यंत बरेचसे अंतर पायी-पायीच जावे लागते. ही पायवाटही म्हणावी तशी चांगली नाही, मात्र बाकीचा रस्ता ब-यापैकी आहे.

या धबधब्याशेजारी श्री व्याघ्रेश्वर मंदिर आहे. हे येथील भाविकांचे श्रध्दा स्थान आहे. जागृत देवस्थान म्हणून या मंदिराकडे पाहिले जाजे. हा परिसर हिरव्यागार सृष्टीने नटलेला आहे.

पर्यटकांना भुरळ घालणारे हे ठिकाण असले तरी तं दुर्लक्षित राहिलेले आहे. त्यामुळे हे पर्यटनस्थळ जिल्हयांच्या पर्यटन स्थळांपासून अद्यापही दूर आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :
  मालवण जवळ राहण्यासाठी हॉटेल्स उपलब्ध आहेत.

 • कसे जावे :
  विजयदुर्ग-तळेर मार्गावर तरळयापासून 20 कि.मी अंतरावर मणचे फाटा आहे. तेथून 5 कि.मी. अंतरावर मणचे धबधबा आहे. देवगड पासून 35 कि.मी. अंतर आहे.

 • विमान :
  जवळील विमानतळ दाबोलीम आहे.

 • रेल्वे :
  जवळील रेल्वे स्थानक सावंतवाडी असून हे २० किमी असलेल्या मालवण बंदर पासून जवळ आहे.

 • बस :
  मुंबई पासून मालवण ५३५ किमी आहे.

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :

  विजयदुर्ग किल्ला , व्याघ्रेश्वर मंदिर

 • नकाशा : व्याघ्रेश्वर धबधबा

 •  
 • सामाजिक दुवा :