Failed to add new visitor into tracking log बल्लाळेश्वर मंदिर | पाली | रायगड | Pali Ballaleshwar | Ballaleshwar temple | Pali Ganpati mandir | Ashtavinayak
English
Marathi

बल्लाळेश्वर मंदिर

रायगड , पाली

बल्लाळेश्वर मंदिर फोटोगॅलरीबल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.

नाना फडणवीस यांनी यालाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.

आख्यायिका

हे अष्टविनायकापैकी पाचवे पालीच्या बल्लाळेश्‍वराचे स्थान आहे. गणेशपुराणात या स्थानाचा उल्लेख व कथा आहे. बल्लाळ नावाच्या एका लहान मुलाच्या भक्तीवर संतुष्ट होऊन श्री गणेश हे त्या मुलाने पूजलेल्या शिळेत येऊन राहिले. त्यानंतर ही भूमी गणेशक्षेत्र म्हणून प्रसिद्ध पावली. भाद्रपद शु. चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या शुभकामना मी पूर्ण करीन, असा श्रीगणेशाचा आशीर्वाद आहे. हाच तो बल्लाळ विनायक. हे प्राचीन काळापासून जागृत स्थान मानले जाते. पेशवेकाळात सदर देवस्थानाला कौल लावून न्यायनिवाडे करीत.

पालीमध्ये प्रवेश केल्यावर प्रथम लागते ते बल्लाळेश्‍वर मंदिर. त्यात बल्लाळेश्‍वराची स्वयंभू मूर्ती आहे. त्यानंतर दुसरे मोठे मंदिर बल्लाळेश्‍वराचे आहे. हे देऊळ फार रमणीय आहे. बांधकाम चिरेबंदी असून, त्या प्रचंड चिऱ्यांच्या बांधकामात शिसे ओतून भिंती अत्यंत मजबूत केल्या आहेत. देवालयापुढे सभामंडप आहे. मंदिरासमोर दोन तळी व घाट आहेत.

देवळाच्या मागच्या बाजूस श्रीधुंडीविनायकाचे देऊळ असून, त्यात श्रीधुंडीविनायकाची स्वयंभू मूर्ती आहे. पूजाअर्चा करताना प्रथम श्रीधुंडीविनायकावर अभिषेक, आवर्तने व मग बल्लाळेश्‍वरावर, अशी प्रथा आहे.गाभाऱ्यात बल्लाळविनायकाची ३ फूट उंचीची मूर्ती आहे. सोंड डावीकडे झुकलेली आहे.

उंदराची मूर्ती हातांमध्ये मोदक घेऊन श्रीगणेशाकडे पाहत उभी आहे.भाद्रपद व माघ मध्ये पाच दिवस दरसाल उत्सव होतात. दरऱ्याच्या दिवशी श्रींची पालखी निघते. विनायकी चतुर्थीला येथे श्रीगजानन मध्यरात्री प्रत्यक्ष भोजनास येतात, अशी श्रद्धा असल्याने या दिवशी दर्शनास विशेष गर्दी असते. दरमहा विनायकी व संकष्टी चतुर्थी या दिवशी पालखी निघते.देऊळ व सभामंडप भव्य आहेत. यात्रेकरूंच्या सोईसाठी अतिथिगृहाची सोय आहे. गाव मोठे असल्याने भोजनालये व राहण्याची सोय आहे. या देवस्थानाची व्यवस्था श्रीमंत मोरोबादाद फडणीस यांनी करून दिली.

 • राहण्यासाठी खोल्या :

 • कसे जावे :

 • विमान:

 • रेल्वे :

 • बस:
  थेट मुंबईहून पालीला एस.टी.ची वाहतूक असते. खोपोली, कर्जत व पनवेल येथूनही पालीस नियमीत बसेस जातात. पुणे ते पाली हे अंतर १११ किलोमीटर एवढे आहे.

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

 • अधिकृत संकेतस्थळ : www.alibaugtourism.com

 • नकाशा :बल्लाळेश्वर मंदिर

 •  
 • Social Links :