Failed to add new visitor into tracking log लक्ष्मी नारायण मंदिर | Laxmi Narayan temple | LakshmiNarayan Temple kudal | Sindhudurg | places to visit in kudal
English
Marathi

लक्ष्मी नारायण मंदिर

सिंधुदुर्ग , कुडाळ

लक्ष्मी नारायण मंदिरलक्ष्मी नारायण मंदिर सिंधुदुर्गातील कुडाळ वरून १५ कि.मी. वालावल येथील लक्ष्मी नारायण. मंदिर. १४ व्या शतकात बांधलेले हे अतिशय प्राचीन व उत्कृष्ठ शिल्पाकृती असलेले देवालय आहे. या देवालयाची रचना, लाकडी कोरीव काम, अंतर्भागाची सजावट, बाजूस असलेला तलाव, त्यात फुललेली कमल पुष्पे रसिकाना मोहिनी घालतात. मंदिर सभोवतालचा परिसर पण निसर्गरम्य आहे.मंदिरा शेजारी एक तलाव आहे.असे म्हणतात गावातल्या माणसाला त्या तलावापासून काही भीती नाही.पण बाहेरच्या माणसाना मात्र तो हमखास ओढून नेतो.असे काही प्रकार झाले आहेत.त्यामुळे बाहेरील व्यक्ती तलावात सहसा उतरत नाही.रामनवमी ला येथे मोठा उत्सव असतो. चंद्र - सूर्याचे दर्शन येथे एकाच वेळी घडते. मंदिराचे उत्तरेस वालावल खाडीचे सौंदर्य अप्रतिम आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :
  मंदिरापासून ४ - ५ किमी दूर राहण्यासाठी जागा उपलब्ध आहे. प्रवासी कुडाळ , कणकवली किवा मालवण इथे राहू शकतात. एक दिवसीय सहल साठी हा स्पॉट समाविष्ट करू शकता.

 • कसे जावे :

 • विमान :
  दाबोलीम,गोवा

 • रेल्वे :
  कुडाळ

 • बस :
  कुडाळ ते वालावल १५ किमी

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  सिंधुदुर्ग किल्ला , धामपूर तळे , तारकर्ली समुद्रकिनारा , भगवती मंदिर , रामेश्वर मंदिर , भालचंद्र महाराज आश्रम , कुणकेश्वर मंदिर आणि समुद्रकिनारा , भोगावे समुद्रकिनारा , निवती समुद्रकिनारा , शिरोडा वेळागर समुद्रकिनारा

 • अधिकृत संकेतस्थळ : www.vengurlatourism.com

 • नकाशा : लक्ष्मी नारायण मंदिर

 •  
 • Social Links :