Failed to add new visitor into tracking log श्री संस्थान आश्रम | Shri Sansthan Ashram | Shri Sansthan Ashram vengurla | Places to visit in Vengurla
English
Marathi

श्री संस्थान आश्रम

सिंधुदुर्ग ,दाभोलीश्री संस्थान आश्रम वेंगुर्ले शहरापासून ६ कि.मी. अंतरावर दाभोली या निसर्ग संपन्न गावात कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मणांचे परमपूज्य गुरु श्रीमंत पूर्णानंदस्वामींचा मठ आहे. हा मठ म्हणजेच कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण जातीचे धर्मपीठ आहे. निसर्गरम्य दाभोली गावी दोन डोंगरांच्या मध्ये हा मठ आहे. मठाच्या पश्चिम बाजूस पाण्याची लहानशी तळी असून तिला जिवंत डोंगरी झरा आहे. वैशाख-ज्येष्ठ महिन्यात सुध्दा ही तळी पूर्ण भरलेली असते या तळीच्या जलाशयाला पवित्र तीर्थाप्रमाणे मानतात. सुमारे पावणे तीनशे वर्षापूर्वी कुडाळ देवस्थ आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीचे परमपुज्य आद्यधर्मगुरु श्रीमंत पूर्णानंद स्वामी यांनी हा मठ स्थापन केला. तत्पूर्वी तेराव्या शतकाच्या अखेरीस वैदिक धर्माच्या प्रसारासाठी कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मणांनी कुडाळपासून नजीकच सोनवडे या गावी असा मठ स्थापन केला होता. परंतु नंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने व तत्कालीन निर्माण झालेल्या राजकीय बदलत्या परिस्थितीमुळे श्रीमंत पूर्णानंद स्वामीनी दाभोली येथे हा मठ स्थापन केला. दाभोली मठाच्या मुख्य गाभार्यात ती श्रीमंत पूर्णानंद स्वामींची समाधी आहे भारतात संजीवनी समाधी प्रकार रुढ आहे. जिवंतपणी स्वेच्छेने, निर्धारपूर्वक तयार करविलेल्या समाधी विवरात स्वतः उतरुन चिरंतन समाधीस बसणे म्हणजे संजीवनी समाधी श्रीमंत पूर्णानंद स्वामींनी सुमारे अडीचशे वर्षापूर्वी १६८७ मध्ये चैत्र व. ४ ला दाभोली मठात संजीवनी समाधी लावली हे समाधीस्थान भक्तांचे प्रचिती पूर्ण आधारस्थान आहे. हे स्थान अत्यंत जागृत असे श्रध्दास्थान आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :

 • कसे जावे :
  वेंगुर्ला पासून ६ किमी दुर.

 • विमान :

 • रेल्वे :

 • बस :

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

 • अधिकृत संकेतस्थळ : www.vengurlatourism.com

 • नकाशा : श्री संस्थान आश्रम

 •  
 • Social Links :