Failed to add new visitor into tracking log सोनुर्ली देवी माउली मंदिर | Shri Sonurli Devi Mauli temple sawantwadi | Places to visit in sawantwadi
English
Marathi

सोनुर्ली देवी माउली मंदिर

सिंधुदुर्ग ,सोनुर्ली

सोनुर्ली देवी माउली मंदिर फोटोगॅलरीसोनुर्ली देवी माउली मंदिर सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावही आपले वेगळेपण जपणारा. लोटांगणाच्या जत्रेसाठी हा गाव प्रसिद्ध! हजारो भक्तगणांची लोटांगणे जत्रोत्सवात पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. कोकणची दक्षिण काशी म्हणूनही सोनुर्ली माउली देवस्थान प्रसिद्ध आहे. माउलीच्या दरबारात भरणारी तुला प्रसिद्ध आहे. कोकण म्हटले की, कौलारू घरे, मातीच्या भिंती हे चित्र सहज डोळ्यांसमोर तरळते. पण आज सर्वत्र बिल्डरांचे प्रस्थ वाढले असल्याने स्लॅबच्या घरांचे जाळे पसरत चालले आहे. सोनुर्ली गाव मात्र त्याला अपवाद आहे. येथे स्लॅबचे घर नावाला सापडणार नाही. येथे मातीच्या भिंतींचा हळूहळू कायापालट होऊ लागला असला तरी या गावात भिंतीसाठी चिर्याचे दगड वापरले जात नाहीत. घरांच्या छप्परावर नळेच असावेत असा गाववासियांचा आजही आग्रह असतो. या परंपरेची जपणूक गाववासीय मोठ्या श्रद्धेने करतात. विटांची घरे येथे पाहावयास मिळतात. 'खेड्यामधले घर कौलारू' कसे असावे ते पाहावे तर इथेच! सुंदर सुंदर पहुडलेली घरे डोंगरमाथ्यावरून पाहताना तर चित्त हरपते. येथे स्लॅबची घरे बांधण्यास देवीचा कौल लागत नाही. काळेत्री दगड घराच्या पायासाठी वापरला जात नाही. तसे करण्यास देवीची परवानगी मिळत नाही. देवीच्या मंदिराचे बांधकाम काळेत्री दगड वापरून करण्यात आले आहे. त्यामुळे काळेत्री दगड घरासाठी वापरू नयेत असा दंडक आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :

 • कसे जावे :
  सावंतवाडी पासून १३ किमी दूर सोनुर्ली हे गाव आहे.

 • विमान :

 • रेल्वे :

 • बस :

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

 • अधिकृत संकेतस्थळ : www.malvantourism.in

 • नकाशा : सोनुर्ली देवी माउली मंदिर

 •  
 • Social Links :