वर्सोली समुद्रकिनारा अलिबाग | Varsoli Beach , Alibag

अलिबाग जवळ असलेला वर्सोली बीच म्हणजे एक शांत समुद्र किनारा ! अलिबागच्या गर्दीच्या तुलनेत हा समुद्रकिनारा काहीसा आत असल्याने तिथलं नैसर्गिक सौंदर्य बघायलाच हवं नारळाच्या झाडांनी वेढलेला हा किनारा सुंदर असला तरी तितकाच स्वछही आहे . परंतु खोल असल्यामुळे पाण्यात जाताना मात्र सावधनता बाळगावी लागते . वर्सोली हे छोटंसं गाव असून अलिबागपासून आतल्या बाजूला सुमारे २० मिनिटांच्या अंतरावर हा समुद्र आहे . गर्दी , गोंधळ यांपासून लांब जायचं असेल तर वर्सोलीचा पर्याय योग्य ठरतो . शिवाय जास्त लांब नसल्यामुळे एक - दीड दिवसाची ट्रीपदेखील पुरेशी ठरते . वर्सोलीत राहायची विशेष सोय नसली तरी अलिबाग जवळ असल्याने तिथे राहून या समुद्रावर जाता येतं .