केळशी समुद्रकिनारा , केळशी दापोली


केळशीचं खास आकर्षण म्हणजे सुमारे अडीच कि.मी. लांबीचा पांढरीशुभ्र वाळू असलेला समुद्रकिनारा व वाळूची टेकडी, या टेकडीवर धावणे-घसरणे म्हणजे लहान मुलांना एक पर्वणीच, तसेच टेकडीवर बसून सूर्यास्त पाहणे म्हणजे आनंदाचा परमावधीच. विस्तीर्ण समुद्र किनारा, महालक्ष्मी मंदिर आणि गणेश मंदिर यामुळे दापोली तालुक्यातील केळशी हे गाव पर्यटन कंेद्र बनले आहे. हे महालक्ष्मीचे मंदिर शके १८०८ मध्ये बांधले असावे, हे मंदिर पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा नमुना आहे. बेलेश्वर, राधाकृष्ण मंदिर, उंटबरकरणी देवीचे मंदिर, उजव्या सोंडेचा गणपती आणि भाईमियांचं बेट ही या ठिकाणची वैशिष्टय़े मानली जातात.