वायंगणी समुद्रकिनारा, वेंगुर्ला | वायंगणी बीच | Vayangani Beach , Vengurla


ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेला वेंगुर्ले-वायंगणी किनारा आता पर्यटकांसाठीही आकर्षण ठरतो आहे. किरात ट्रस्टच्या 'कासव जत्रे'च्या निमित्ताने वायंगणी गाव सहयोगातून पर्यटन नकाशावर आणण्याच्या प्रयत्नांना संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला. कासव जत्रा हा उपक्रम कासव संरक्षण आणि संवर्धनाला पूरक ठरेल, पर्यटनाच्या माध्यमातून गावाची नवी ओळख पर्यटन नकाशावर येईल अशी जत्रेच्या आयोजनामागील भूमिका आहे.