रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी

रत्नागिरी शहरापासून अवघ्या २ ते ३ किमी वर असणारा रत्नदुर्ग हा त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे. येथून दिसणार्‍या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणार्‍या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे या आकर्षणात भरच पडली आहे. रत्नदुर्ग रत्नांगिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्नेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.

इतिहास :रत्नदुर्गाची बांधणी बहामनी काळात झाली. १६७० साली शिवाजी महाराजांनी हा कि

्ला अदिलशहाकडुन जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली.

अन्न सुविधा : गडावर जेवणाची सोय नाही. रत्नागिरी शहरात जेवणाची सोय आहे.

पाणी सुविधा : मंदिराजवळ पिण्याचे पाणी मिळू शकते.