पेशवे जन्म ठिकाण (स्मारक) रायगड , श्रीवर्धन - Peshwa Birth Place Shrivardhan

श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव होय. ३ किमी. लांबीचा अथांग, शांत, मनाला निवांत करणारा सागरतीर हे श्रीवर्धनचे मुख्य आकर्षण होय. येथील पेशवे मंदिरातील चौथर्‍यावर पेशवे स्मारक बांधण्यात आले आहे.

पेशव्यांचे हे मूळ गाव असल्यामुळे त्यांच्याच वास्तुत हे पेशवे मंदिर आहे. याच ठिकाणी श्रीमंत बाळाजी विश्र्वनाथ पेशवे यांचा पेशवाई पगडी व वस्त्र परीधान केलेला पूर्णाकृती सुंदर पुतळा आहे

नारायणदेव मंदिरात पेशवे कुटुंबातील मंडळी दर्शनासाठी येत असत. पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ (कार. १७१३२०) याच्याकडे श्रीवर्धन व आजूबाजूची गावे यांची देशमुखी होती. पुढे बाळाजीने कोकणातील तटबंदी असलेली सोळा ठिकाणे कान्होजी आंगे यास दिली. त्यांमध्ये श्रीवर्धन हे एक

होते. येथे बाळाजी विश्वनाथाच्या वाड्याचा चौथरा अवशिष्ट असून, तेथे श्रीवर्धन नगरपालिकेने १९८८ मध्ये ‘ श्रीमंत पेशवे स्मारक मंदिर ’ उभारले आहे. त्याच्या आतील बाजूस १.५२ मी. उंचीच्या चौथऱ्यावर, तेवढ्याच उंचीचा बाळाजी विश्वनाथाचा ब्राँझचा पूर्णाकृती पुतळा आहे. चौथऱ्याच्या दर्शनी भागावर बाळाजीचा चरित्रवृत्तांत खोदला आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूस ब्रह्मेंद्रस्वामी आणि उजव्या बाजूस छ. शाहू यांचे अर्धपुतळे आहेत. सांप्रत पेशवेवाड्यातील तीन दालनांत बालवाडी, टेबल टेनिस कोर्ट व व्यायामशाळा आहे.

उपरोक्त मंदिरांसह श्रीवर्धन येथे श्रीराममंदिर, आरवी -नारायण मंदिर, देवखोल -कुसुमेश्र्वर मंदिर, वाकळघर- गंगादेवी हीदेखील गावापासून थोडी लांब असलेली प्रेक्षणीय श्रद्धास्थाने आहेत. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली, लाकडी खांबांवर सुंदर नक्षीकाम असलेली, निसर्गाच्या कुशीतील, प्रसन्न शांततेतील ही सर्व मंदिरे इतिहास कथन करतात, तसेच सर्व पर्यटकांना निश्र्चितच खुणावतात.

राहण्यासाठी खोल्या :
श्रीवर्धन येथे राहण्यासाठी हॉटेल्स उपलब्ध आहेत.