दत्तमंदिर सिंधुदुर्ग , माणगाव - Datta Mandir , MANGAON ,SINDHUDURG

दत्तमंदिर, माणगाव हे दत्त सांप्रदायाचे स्थान आहे. तेथे टेंब्ये स्वामींचे भव्य मंदिर उभारले गेले आहे. शिवाय त्यांनी स्थापन केलेले दत्तमंदिर भक्तांचे श्रद्धास्थान आहे. विश्वस्थांनी अद्ययावत धर्मशाळा बांधलेली आहे. तेथे राहण्याची सोय उपलब्ध आहे.आकेरी - माणगाव दत्त मंदिर येथील डोंगरावर असणारी "सिद्धाची गुहा' म्हणजे निसर्गाचा कलात्मक आविष्कारच म्हटला पाहिजे. गजबजाटापासून दूर असलेली ध्यानधारणेसाठीची ही जागा पाहण्यासाठी पर्यटक खूप दूरवरून येथे येतात. ही सिद्धाची गुहा अतिशय प्रेक्षणीय आहे. दत्त मंदिराच्या नैर्ऋत्य दिशेस डोंगरात ही गुहा पाहण्यास मिळते. ती हजारो वर्षे जुनी आहे. सुमारे पंधरा फूट लांब अशी ही गुहा असून गुहेत फिरण्यास पुरेशी जागा आहे. गुहा पाहण्यासाठ

पायवाटेनेच जावे लागते. 1992 मध्ये स्वामींच्या एका भक्ताने गुहेजवळ पायऱ्या बांधून घेतल्या आहेत. पायऱ्या चढल्यावर आपण गुहेच्या सर्वांत उंच ठिकाणी येतो. गुहा पूर्णपणे थंड असून आत हवा खेळती राहते. पाणी झिरपून अत्यंत नयनरम्य असे खडकांचे विविध आकार येथे तयार झालेले आहेत. दर वर्षी सहा हजारांहून अधिक माणसे या गुहेला भेट देतात. श्री प. प. स्वामी महाराजांनी उपासना करून श्री दत्त प्रभूंना येथेच प्रसन्न करून घेतल्याचे सांगितले जाते. स्वामी दररोज या गुहेत ध्यानधारणेसाठी जात असत. आजही या गुहेत सत्यदत्तपूजा केली जाते. यामुळे या गुहेस धार्मिक अधिष्ठान आहे.

(14 k.m. from Kudal) Located at spirtual village Mangaon, birth place of Paramhans Parivajakacharya Vasudevanand Saraswati Tembeswami who established idol of lord Datta at Mangaon. Swami worshipped Lord Datta and obtained his good grace. He also obtained distinction by writing religious books (Granthas). The memorial of this great saint is situated at Garudeshwar, Gujrat. By wandering ceaselessly for nearly 24 years throughout India Swami visited holy places such as Vjjain, Brahmavarth, Haridwar, Petlad, Tilakwada, Dwarka, Chikaladara, Mahatpur, Badhwai, Tanjawar, Mulkyala, Pawani, Havnur, Kuruguddi and Gurudeshwar. At these places Swami had privilege of observing chaturmas (Shravan).

Official Website : http://www.dattamaharaj.com/