भाट्ये समुद्रकिनारा रत्नागिरी ,भाट्ये


रत्नागिरीपासून अगदी जवळ असणारं भाट्ये हे छोटंसं गाव तिथल्या समुद्रकिनाऱ्यासाठी विशेष ओळखलं जातं . इथला लांबलचक समुद्रकिनारा मनाला विशेष भुरळ घालतो . हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या समुद्राकडे तासनतास बघण्यात वेळ कसा छान जातो . साधारण दीड किलोमीटरच्या परिसरात हा समुद्रकिनारा पसरला असून सकाळच्या वेळी ओल्या वाळूवर चालून एक वेगळा आनंद घेत येतो . या बीचमधून रत्नागिरीचं लाईट हाऊस आणि मांडवी बीचदेखील दिसतो . समुद्रावरच्या भेळपुरीची मज घ्यायची असेल तर इथे जायलाच हवं . सगळ्या प्रकारच्या चाट बीचजवळ बसून खाता येत असल्याने पर्यटकांना हा किनारा आवडतो . एक संपूर्ण दिवस आराम करून निसर्गाच्या सोबतीनं राहायचं असेल तर भाट्ये बीच हा एक चांगला पर्याय ठरू शकत

.