गुहागर समुद्रकिनारा , गुहागर

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. विशेषत: गुहागरपासून जयगडखाडीमार्गे रत्नागिरीकडे येताना समुद्र किनाऱ्यावर मनसोक्त मजा लुटता येते. निसर्गाचे सुंदर रुप या प्रवासात पाहायला मिळते

   गुहागर हे निसर्ग सौंदर्याचे आगार आहे. समुद्रकिनाऱ्याचे सुरुबन, नारळ-पोफळीची दाटीवाटी उभ्या असलेल्या बागा, वड-पिंपळाचे विस्तारलेले वृक्ष अशी समृद्धी या परिसराला लाभली आहे. इथल्या विस्तारलेल्या समुद्रकिनाऱ्यावरची भटकंती आनंददायी असते. समुद्रस्नानाची मजा लुटतानाच किनाऱ्यावरील नारळीच्या बागेत निवांत क्षण घालविण्याचा अनुभव काही वेगळाच असतो.