सरसगड किल्ला रायगड ,पाली खोपोली - Sarasgad killa , Pali Khopoli

सरसगड किल्ला १६०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील पाली डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

श्री गणेश म्हणजे विद्येची देवता. पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाणे. येथील गणपती ‘बल्लाळेश्वर’ म्हणून ओळखाला जातो. याच पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड. पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते. पाली गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र भिंत उभी आहे. या गडाचा उपयोग मुख्यतः टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसर टेहंळणी करता येते. शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यादाखल करून थेतले आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी २००० होन मंजूर केले. स्व

तंत्र्यप्राप्ती पर्यंत या गडाची व्यवस्था ‘भोर’ संस्थानाकडे होती.

जेवणाची सोय आपण स्वतः करणेच योग्य आहे. गडावर पाण्याची भरपूर टाकी आहेत. पण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी शहापीराच्या उजव्या बाजूस असणारा हौद पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

राहण्यासाठी खोल्या :
गडावर तसे पाहिले तर राहण्याची व्यवस्थित सोय नाही. मात्र ७ ते ८ जणांना दिंडी दरवाज्यासमोर असणाऱ्या देवड्यांमध्ये अथवा धान्यकोठारे, कैदखाना येथे रहाता येते. पण गडावर फार कमी ट्रेकर्स रहातात.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

तसे पाहीलं तर हा गड दोन ते तीन तासात न्याहाळता येतो. दिंडी दरवाजाला लागूनच तिहेरी तटबंदीची रचना आपणास बघावयास मिळते. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे आणि १५ पायऱ्यावर चढाव्यात म्हनजे तटबंदी दिसते. दरवाज्यतून आत शिरल्यावर डावीकडे गेल्यावर एक मोठा पाण्यचा हौद लागतो. पुढे एक भुयारी मार्ग लागतो. सध्या हा मार्ग मात्र अस्तित्वात नाही. पुढे गडावर येणारा दुसरा मार्ग आहे. याच्या जवळच ‘मोती हौद’ आहे. जर आपण उजवीकडे गेलो तर १५ पायऱ्या चढाव्या लागतात आणि मग बालेकिल्ल्याचा पायथा लागतो.