शिवगड किल्ला , फोंडा घाट - Shivgad Fort , Fonda Ghat

कोल्हापूर व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य आहे. या अभयारण्यात अपरिचीत असा शिवगड किल्ला आहे. मालवण, आचरा इत्यादी तळकोकणातील बंदरात उतरणारा माल अनेक घाटमार्गांनी सह्याद्रीच्या पठारावरील बाजारपेठांत जात असे. अशा घाटमार्गांपैकीच फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी शिवगडाची उभारणी करण्यात आली होती. राधानगरी व कळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या व जीववैवध्यतेने नटलेल्या दाजीपूर अभयारण्याला बरेच पर्यटक भेट देतात, पण अभयारण्यातच असलेला शिवगड पाहाण्यास फारसे पर्यटक फिरकत नाहीत. खरेतर थोडासा चढ व आटोपशीर आकार असलेला किल्ला दाजीपूरच्या भेटीत आरामात पहाता येण्यासारखा आहे.

शिवगड पाहाण्यासाठी दाजीपूर अभयारण्याच्या

प्रवेशद्वारातून माणशी रुपये २०/ भरुन प्रवेश घ्यावा लागतो. अभयारण्यातील कच्च्या रस्त्याने फॉरेस्ट रेस्ट हाऊसपर्यंत गेल्यावर एक पायवाट गगनगिरी महाराजांच्या आश्रमापाशी जाते. या वाटेने अर्धातास चालल्यावर आपण शिवगडासमोरील पठारावर येतो. पठार व शिवगड यांच्यामध्ये एक टेकाड आहे. पठारावरुन खाली उतरुन मधल्या टेकाडाला वळसा घालून थोडासा चढ चढून शिवगडावर जाता याते. येथे तटबंदीचे काही अवशेष दिसतात. शिवगडाच्या वायव्य दिशेकडे तोंड करुन असलेल्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. प्रवेशद्वाराचे बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर एक लांबलचक तटबंदी दिसते. गडाचे संरक्षण करण्यासाठी या दुहेरी तटबंदीची योजना केली असावी. तटबंदी ओलांडून पूढे गेल्यावर उजव्या बाजूस एक बूरुज दिसतो. गडाच्या पठारावर एक सुंदर सती शिळा आहे. स्थानीक लोक तीला 'उगवाई देवी' म्हणतात. तेथून उत्तरेच्या बुरुजावर गेल्यावर खाली कुर्ली धरण दिसते. तटबंदीच्या कडेकडेने दक्षिण बुरुजापाशी गेल्यावर बुरुजा खालून कोकणातील गडगे सखल गावातून येणारी वाट दिसते, तर दक्षिणेला फोंडा गाव दिसते. या शिवाय गडावर वाड्याचे काही अवशेष आहेत. गडाचा आकार आटोपशीर असल्यामुळे गड पाहाण्यास अर्धातास पुरतो. गड उतरुन परत येताना टेकडाला वळसा घातल्यावर समोरच्या कातळावर धबधब्यांच्या खुणा दिसतात. या धबधब्याजवळ पाण्याचे एक टाक आहे. धबधब्याचे पाणी पाटाने टाक्यात वळवलेले आहे. गडावर पाण्याची व्यवस्था आढळत नाही. या कुंडातील पाण्याचा वापर गडासाठी होत असावा. गडावरुन आजूबाजूचा परिसर पाहात असतांना पूर्वेला दाजीपूरच्या जंगलात एका मंदिराचे शिखर दिसते. मंदिर असलेल्या या परिसराला 'झांजेचे पाणी' म्हणतात. गड पाहून परत उगवाईच्या पठारावर येऊन कच्च्या रस्त्यावरुन जंगलाच्या दिशेने चालत गेल्यावर १० मिनिटात आपण मंदिरापाशी पोहोचतो. गगनगिरी महाराज येथे तपसाधनेसाठी बसत असत. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही घरे आहेत. ती ओलांडून पूढे गेल्यावर एक बारामाही वाहणारा झरा आहे. त्यास झांजेचे पाणी म्हणतात. येथून शिवगडाचे दर्शन होते. येथून अर्ध्यातासात परत अभयारण्याच्या प्रवेशद्वाराशी जाता येते. याशिवाय दाजीपूर अगयारण्याची भटकंती सुध्दा करता येते. अभयारण्यात भटकंतीसाठी २१ किमी चा कच्चा रस्ता आहे. गाईड सोबत घेऊन जंगल पाहाणे सोईचे आहे.

Shivgad Fort Shivgad Fort Shivgad Fort Shivgad Fort Shivgad Fort
Shivgad fort is located at Ghonsari, Phondaghat. This fort is a major attraction for the adventurous tourists, trekkers and the mountaineers. The view of the area surrounding the fort is a major attraction here since the terrain and peaks of this region comes in contact with Asia's largest known biodiversity for flora and founa Dajipur Bison sanctuary.

To reach the Shivgad fort one has to go through the Dajipur forest. Gagangad and Kasarde Salva mountains clearly visible from this fort. There is also a temple of Goddess Bhavanimata's. Cannons are also seen inside the fort but to vive all this one has to trek to the top.