वरद विनायक मंदिर ,महड | Varad Vinayak Mandir, Mahad

अष्टविनायकां पैकी प्रसिध्द श्री वरदविनायकाचे मंदिर रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात महड येथे आहे. प्राचीन काळी महड हे भद्रक, मढक या नावाने ओळखले जात असे.

वरदविनायक हा भक्ताच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा व मनोकामना पुर्ण करणारा देव आहे.

पेशव्यांचे सरदार रामजी महादेव बिवलकर यांनी साधारण १७३० मध्ये हे मंदिर बांधुन लोकार्पण केल्याचा उल्लेख आहे, मंदिर साध्या बांधणीचे व लहानसे असुन कौलारु आहे.

माघ व भाद्रपद महिन्याच्या सुरवातीचे पाच दिवस येथे मोठा उत्सव असतो. मंदिरा मध्ये १८९२ पासुन नंदादीप सतत तेवत आहे.

श्री धोंडू पौडकर यांना इ.स. १६९० मध्ये एका तलावामध्ये श्री वरदविनायकची स्वयंभू मूर्ती सापडली. ही मूर्ती

काही काळ जवळपास देवीच्या मंदिरात ठेवली होती. १७२५ मध्ये पेशवा सरदार रामजी महादेव बिवालकर यांनी प्रख्यात वरद विनायक मंदिर बांधले आणि त्यांनी हे मंदिर गावाला भेट म्हणून दिले. मंदिराची रचना सामान्य घरासारखी दिसते.