Contact Us :
कुणकेश्वर मंदिर - कुणकेश्वर, सिंधुदुर्ग | Kunkeshwar Mandir -Kunkeshwar Sindhudurg
श्री क्षेत्र कुणकेश्वर.... कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र...अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी... कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर... देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे ११०० व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापुर या शहरांशी देवगडहुन अवघ्या १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे.एसटी थांबते तेथून अवघ्या ५-७ मिनिटांच्या अंतरावर असणार्या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो.ऐन किनार्याशी असणार्या उंचवटयावर उभारलेल्य
या मंदिरचा सागरतटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे. ८-९ मीटर उंचीच्या या तटावर असणार्या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर २२-२४ मीटर उंचीच मंदिर आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित तर आहेच, पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे. अशा या कुणकेश्वर मंदीराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे.
सिंधुदुर्ग किल्ला देवस्थानच्या परिसरात समुद्रकिनारी काही शिवलिंग आहेत. त्यापैकी २१ शिवलिंग आपणास पाहावयास मिळतात. या शिवलिंगामागील इतिहास असा आहे की, गेली कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये असणारी ही शिवलिंग झिज होत असतानासूद्धा ती पुर्ववत प्रमाणे आहेत अशी निदर्शनास येतात. इतका काळ लोटला तरी त्यांची म्हणावी तितकी झिज झालेली नाही. गेले कित्येक वर्षे यात्रेकरु या शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत. ही शिवलिंग पांडवांनी घडवलेली आहेत अशी श्रद्धा आहे. याची साद देणारी पांडवलेणी आजही येथे आहेत.
सिंधुदुर्ग किल्ला देवळापासुन जवळच पूर्व दिशेस डोंगराच्या उतरणीवर काही लोक जमीन खणत असताना पूर्वकाळापासून कित्येक शतके बुजालेले एका गुहेचे दार मोकळे होऊन आंत कोरीव पाषाणी मूर्ती आढळून आल्या ही गुहा म्हणजे इतर कोरीव लेण्यांप्रमाणे एक लेणी आहे. पण यातील मूर्ती मात्र गुहेच्या दगडांवर कोरलेल्या नसून त्या अलग आहेत. गुहेची खोली तांबडया कापाच्या दगडाची असून मूर्तीचा दगड काळा-काळित्री आहे. हा काळा दगड गावात समुद्राच्या कडेस आणि डोंगराच्या कडयांत क्वचित स्थळी सापडतो.या गुहेला सध्या पांडव लेणी म्हणून ओळखले जाते. गुहेची खोली सुमारे १० फुट लांब ८ फुट रूंद आणि ६ फुट उंच असून, पाच फुट उंच आणि तीन फुट रूंद असा दरवाजा आहे. आत १८ कोरीव मुखवटे शिवलिंग आणि नंदी मिळून २० नग आहेत. मुखवटयांची मांडणी जोडी जोडीने केलेली आहे. पुरूष व स्त्री अशा ८ जोडया, एक तरूण पुरुषाचा मुखवट स्वतंत्र बसवलेला आहे. तसेच एक पुतळयाची नासधूस झाल्यामुळे तो पुरूषाचा किंवा स्त्रीचा हे नीट ओळ्खता येत नाही. त्यामुळे तो एका बाजुस ठेवला आहे. शिवलिंग आणि नंदी हे देखिल काळा- (काळित्री) दगडाचे असून गुहेत प्रवेश केल्यावर तिच्याध्यभागी पण जरा डाव्या बाजूस ठेविले आहेत. गुहेतील मुर्त्या हया देवतांच्या मुर्ती नसून राजघराण्यातील स्त्री पुरूषांचे ते मुखवटे आहेत. त्यांचे कोरीव काम उच्च दर्जाचे दिसून येते. कौशल्यामध्ये ओबडधोबडपणा कमी असून रेखीव व सुबकपणाकडे कोरण्याकडे चांगलेच लक्ष दिले आहे. पुरूषांच्या आकृती जरा मोठया असून त्या मानाने स्त्रियांच्या लहान आहेत. प्रत्येक जोडप्यास निराळी बसकण आहे. प्रत्येक मुखवटयाला राजास आणि राजघराण्यातील स्त्रीपुरूषांस शोभेल असाच पेहराव केलेला आहे. प्रत्येक मुखवटयास शिरपेच, डोकिच्या एका बाजूस तुरा, मोत्यांचे पेड कोरीव कामांत दाखविले आहेत. तसेच महाराष्ट्रीय वळणाची शिरोभूषणे आपणास या मुर्त्यांवर पाहावयास मिळतात.या बाबतचे आणखी संशोधन चालू आहे. मुळात कोकणात लेणी थोडी आहेत. आणि अशा तर्हेचे लेणे तर नाहीच.
Other Details
श्री कुणकेश्वर मंदिर ट्रस्ट एक स्वस्त दराने "भक्त निवास" नावाचे त्यांचे सुंदर बांधण्यात रूम त्यांचे भक्त निवास करण्यासाठी पुरवते.
रस्त्याने :
NH17 (मुंबई-गोवा महामार्ग) वरील नांदगाव गाव ते कुणकेश्वर मंदिर : 42 किमी
देवगड ते कुणकेश्वर मंदिर : 14 किमी
मुंबई ते कुणकेश्वर मंदिर : 492 किमी
पुणे ते कुणकेश्वर मंदिर : 387 किमी
कोल्हापूर ते कुणकेश्वर मंदिर : 387 किमी कोल्हापूर ते
प्रियकर 16 किमी वाहने देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथून एसटी बसेस धावतात.
रेल्वेने :
कोकण रेल्वेवरील सर्वात जवळचे प्रमुख रेल्वे स्टेशन कणकवली आहे, ४९ किमी. नांदगाव रेल्वे स्थानक ४२ किमी आहे.
हवाई मार्गे :
चिपी मालवण येथील सर्वात जवळचे विमानतळ MSH-4 किमी मार्गे 1 तास 20 मिनिटे (61.2 किमी) आहे. मुंबई विमानतळ ४९२ किमी आहे.