विजयदुर्ग किल्ला , गिर्ये | Vijaydurga Fort

विजयदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग वाघोटन खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर उभा आहे. शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत म्हणजे सन 1993 ते 1206 या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला. कोल्हापूरच्या पन्हाळा येथे शिलाहार घराण्यातील भोज राजा राज्य करीत होता. भोज राजाने एकंदर 16 किल्ले बांधले व काहींची डागडुजी केली त्यात विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. सन 1200 मध्ये तो बांधला गेला असावा असा अंदाज आहे.

इ.स. 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकेपर्यंत या किल्ल्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली. शिलाहारांचे राज्य देवगिरीच्या यादवांनी इ.स. 1218 मध्ये बुडविले. इ.स. 1354 मध्ये विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला व कोकण प्रांत बळकावला

पुढे इ.स. 1431 मध्ये बहमनी सुलतान अलउद्दीन अहमदशहा याने विजयनगर राजाचा पराभव केला. 1490 ते 1526 या काळात बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले. त्यात विजापूरचा आदीलशहाकडे कोकणप्रांत सोपविला गेला. त्यानंतर 1653 पर्यंत सुमारे 129 वर्षे विजयदुर्ग विजापूरकरांच्या अंमलाखाली राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 साली हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला. छत्रपती शिवाजी महरांजानी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा साधारण 5 एकर क्षेत्रात हा किल्ला विखुरलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आरमारी केंद्र स्थापन करावयाचे असल्याने त्यांनी किल्ल्याची दुरुस्ती व व्याप्ती केली. 14 एकर 5 गुंठे इतक्या क्षेत्रापर्यंत या किल्ल्याची व्याप्ती वाढविली. पूर्वेच्या बाजूला नवीन तटबंदी उभारली.

किल्ला कसा पहाल किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मारुती मंदिर आहे. पडकोट खुष्क म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी सोडून कांही अंतरावर बांधलेली तटबंदी. मुख्य दरवाजाला संरक्षण देणार्‍या निबीच्या दरवाजापुढे गेल्यावर 30 मिटर उंचीची तटबंदी. मुख्य दरवाजाच्या आत एक लहान दरवाजा होता, त्यास दिंडी दरवाजा म्हणत. रात्रौ मुख्य दरवाजा न उघडता त्याचा जाण्या-येण्यासाठी उपयोग करीत. डाव्या बाजूला खलबतखाना नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये सभा बैठका होत. या इमारतीचच्या समोर दारु-गोळ्याचे कोठार आहे. पुढे गेल्यावर भुयार दिसते. भुयाराच्या बाजूने तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या किल्ल्यास विविध नावाचे 18 बुरूज आहेत. तटावरुन चालतांना बारकाईने पाहिल्यास तटाखालील कोठारे दिसून येतात. कांही अंतर चालून गेल्यावर लाईट हाऊस दिसते. लाईट हाऊसच्या पुढे तटाच्याखाली चुन्याचा घाणा दिसतो. तटाते बांधकाम करतांना दगडामध्ये सांधण्यासाठी वापरावयाचे सिमेंट मिश्रण म्हणून चुना, रेती, गुळ, हरड्याचे पाणी व नारळाचा काथा या घाण्यामध्ये मिश्रण करुन सिमेंट बनवत. चुन्याचा घाण्याच्या बाजूला गोड्या पाण्याच्या विहिरी, साहेबाचे ओटे, भवानी मातेचे मंदिर, जुने रेस्ट हाऊस, जखीणीची तोफ यासारख्या गोष्टी येथे पहावयास मिळतात.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

विजयदुर्ग' गावात धुळप च्या राजवाड्याचा घर नैसर्गिक रंगांचा काही सुंदर भिंत चित्रकार आहे. हे चित्रकार मराठा शैलीतील आहेत. गिर्ये येथे रामेश्वर मंदिर पासून किल्ला 3 कि.मी. आहे. मंदिर या दगड कमानीचा दरवाजा आणि मळलेली वाट आहे