नापणे धबधबा ,वैभववाडी कणकवली | Napne Waterfall , Vaibhavwadi

शंभर फुटांवरून कोसळणारे पाणी, त्यातून निघणारे दवबिंदू, 40 फूट उंचीचा डोह, पक्ष्यांचा किलबिलाट आणि धबधब्याच्या दोन्ही बाजूंनी वेढलेली वृक्षवल्ली असे अद्‌भुत आणि निसर्गाने भरभरून दिलेले ठिकाण म्हणजे नापणे धबधबा. राज्यासह परराज्यांतील शेकडो पर्यटक या धबधब्यावर येतात आणि पर्यटनाचा आस्वाद लुटतात. धबधब्याच्या वरच्या बाजूस नाधवडे तिथे महादेवाचं मंदिर आहे. त्या नजीक दगड कपारीतून पाण्याचा प्रवाह वर येतो. तीच ही नदी पुढे नापणे धबधब्यापर्यंत जाते.

बारमाही वाहणारा जिल्हा परिसरातील हा एकमेव धबधबा आहे. त्यामुळे इतर धबधब्यांचे पाणी आटल्यानंतर पर्यटकांचा ओढा या धबधब्याकडे वाढतो. धबधब्याचे पाणी ज्या कड्यावरून कोसळते, त्या पाण्यावरून व्हॅली क्रॉसिंगचा अनुभव घ

ता येतो. दोरीवरून लटकत जाणाऱ्या व्यक्तीला धबधब्याचे कोसळणारे पाणी, डोह अगदी जवळून पाहता येते. हे साहसी पर्यटन असले, तरी यामध्ये कोणताही धोका नाही. नापणे धबधबा हे अप्रतिम पर्यटनस्थळ आहे.