भगवती मंदिर , कोटकामते देवगड | Bhagwati Mandir , Devgad

भगवती मंदिर देवगड-आचरा-मालवण मार्गावरील देवगड पासून 19 कि.मी. आणि मालवणपासून 29 कि.मी. अंतरावर असणा-या नारिंग्रे गावापासून 6 कि.मी. अंतरावर कोटकामते हे गाव आहे. येथे सुमारे 50 वर्षांपूर्वी (शके 1647) सेना सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बांधलेले श्री भागवती मंदिर आहे. तशा आशयाच्या शिलालेख या देवालयाच्या भिंतीवर आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या गावात पूर्वी एक किल्ला होता. त्यावरूनच या गावाला कोटकामते हे नाव पडले आहे. हा संपूर्ण परिसर आमराईने नटलेला आहे. आता किल्ला नामशेष झाला असून त्याचे काही अवशेष शिल्लक आहेत. गावात प्रवेश करताना दिसणारा बुरूज आणि थोडीफार तटबंदी एवढेच अवशेष शिल्लक आहेत. मंदिरापर्यंत जाण्यास उत्तम रस्ता आहे. मंदिरात देवीची पाषाणी रेखीव मूर्ती

हे. मंदिरासमोर वड व पिंपळाचे दोन जुनाट वृक्ष आहेत. या वृक्षाखाली देवळाच्या प्रवेशद्वारापाशी देवीचे वाहन असलेली सिंह प्रतिमा आहे. मंदिराच्या सभा मंडपाला लाकडी खांब असून त्यावरील कोरीव नक्षीकाम अप्रतिम आहे. मंदिराशेजारी दोन ताफा आहेत. दस-यात येथे नवरात्रोत्सव फार मोठ्या आणि पारंपारिक पध्दतीने शाही थाटात संस्थानिकांना शोभेल असा साजरा केला जातो. येथील उत्सवाचा आनंद लुटणे म्हणजे एक पर्वणीच आहे.